
बार्शी शहराचा होत असलेला विस्तार पाहता ग्रामीण भागांमधील मतिमंद मुकबधिर मुलांना शासन स्तरावरील शैक्षणिक सुविधा मिळत नसत, शासन स्तरावरील विविध सोयी पासून अशी मुले वंचित राहू नये या उद्देशाने राजीव स्मृती बहुउद्देशिय संस्था, बार्शीची स्थापना सन १९९२ मध्ये करणेत आली. या संस्थेअंतर्गत ग्रामीण मुले तसेच बार्शी शहर लगत मराठवाड्यातील कळंब, भूम, उस्मानाबाद तालुका मधील मुलांसाठी मतिमंद व मुकबधिर निवासी शाळा सुरू केल्या.